Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Kadam

Abstract

4  

Prashant Kadam

Abstract

टप टप बरसत पाऊस आला

टप टप बरसत पाऊस आला

1 min
13.7K

आला आला सूरू जाहला

मना मनांमध्ये आसुसलेला

ढगा ढगांतून ह्या साठवलेला

दाट दाट अशा मेघांमधूनी 

टप टप बरसत पाऊस आला !

गार गारवा अपसूक आणूनी

चरा चरांला ऊल्हसित करूनी

लख लख वीजांची वर्दी देऊनी 

कड कडाट चौघडा बडवीत आला

टप टप बरसत पाऊस आला !

नदी नाले ही भरू भरू लागले

डोंगर दरींतून झरे प्रसवले

धब धब्यांतूनही दूध फेसाळले

पाणीच पाणी बहरत आला

टप टप बरसत पाऊस आला !

हिरवी हिरवी सृष्टी जाहली

फुला फुलांनी बागही सजली 

जागो जागी शेते सळसळली

कणा कणांत रोम हर्षवीत आला

टप टप बरसत पाऊस आला !

आता आता तरी मंथन व्हावे

मुल्य अमुल्य पाण्याचे कळावे

पाट पाण्याचे बंधारे बांधावे

तळ्या तळ्यांतून साठत आला

टपटप बरसत पाऊस आला !

Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract