मकर संक्रांत..!
मकर संक्रांत..!
1 min
282
तीळ गुळ घ्या
गोड गोड बोला....!
तीळ गुळ घ्या
गोड गोड बोला....!
पण का ? कश्यासाठी...?
प्रश्न पडलाय मनाला
अनुभवाच्या गाठी
सोडवता सोडवता...
जीवन वहात चाललंय
अखंड पणे
अडथळ्यांना न जुमानता....
आजवर सारेच
गोडबोले अन
खोडमोडेच भेटले....
तरीही त्यांच्यासाठी
सारे जीवन
आजवर वेचले....
त्यांना त्याची
ना कदर ना जाणं
जरी रीती झाली प्रेमाची खाण...
एक दिवस येतो
हातात तिळगुळ
गोड गोड बोलायला....
आणि पुन्हा
दुखावलेले धागे
हळू हळू उसवायला....
पण इतके मात्र खरे
याही वेळी हीं
मी गोडच बोलणार....
नाहीतर देवा
मकरसंक्रांत तरी
कशी साजरी होणार ...?