तुह्या प्रितीचा सागर
तुह्या प्रितीचा सागर
तुया हातच्या रेघित
माह्य नाव म्या कोरलं
तुले पाहीसनं रानी
माह्य मनं हरखलं //१//
तुह्य गालात हासनं
तुह्य लाजरं बोलनं
माह्या जीव कासाइस
आंग मोळित चालनं //२//
वर्ऱ्हाळच्या मातीले थ्यो
गंध लेखनी बहार
तसा झयकते माह्या
दिया वातीचा संसार //३//
झोरा माह्या परपंच
जसा पाठी गा पेलला
माह्या आंगनात खेये
बाल गोपायांचा मेला //४//
राघू-मैनेची गं जोळी
घास चिल्या-पिल्यां संग
मीठ भाकरं कष्टाची
पिरतीत ग्वाड लागं //५//
माह्या ह्रदयात वसे
अभायीचा त्थो निर्झरं
तुह्या डोयातचं दिसे
माह्या पिरतीचा सागरं //६//