Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

गझल

गझल

1 min
339


भास होई सावल्यांचा मेघवारा येत नाही

मातगंधाला अवेळी तो भरारा येत नाही ||


राम जाणे काळ कसला ढोंग नकली याचकांचा

रडतया जनता इथे पण तो उतारा येत नाही||


कोण कैसा ओळखावा आत काही बाह्य काही

आव आणे खास भारी धावणारा येत नाही||


विकतो बाजार भावा आपल्या रे मायबहिनी

रूपयाचे मोल भारी नेत्रधारा येत नाही ||


ध्येय ठेवा सोडतोया जिद्दही जो मोडतोया

कर्तव्य वेशी टांगतो हा ऐकणारा येत नाही ||


कोरड्या त्या सागराला ओल काही येत नाही

कोसणाऱ्या पावसा काठी किनारा येत नाही ||


भूक होती चूल होती भाकरी बनवायला पण

लाकडे ओली अग्नीला चेतणारा येत नाही ||



Rate this content
Log in