प्रवाह
प्रवाह
1 min
14K
नदीचा प्रवाह
ओसंडत होता
अंगणातला पाऊस
जमीनीतच मुरत होता...
एकाच ठिकाणी
दडी मारुन बसण्यापेक्षा
ओसंडुन स्वतः ला
हरवलेल चांगलं
सुगंधी मातीच्या कुशीत
येणारी झोप घेण्यापेक्षा
वाटेतल्या खडकांचा गार
स्पर्श झालेला बरा...
बघावं तरी
किती मोलाच असतं
त्या खडकांच एकटेपण
पण ओसंडणार्या प्रवाहात
खडकांना तोडुन बोलकं
करायची ताकद असते ..
त्याला विसावा आवडतच नाही कदाचित्
नि पाऊस माञ जमीनीतच
भिजत राहतो अवचित् !!!!!