Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Romance

3  

Abasaheb Mhaske

Romance

अशा सांजवेळी ..

अशा सांजवेळी ..

1 min
7.1K


पाखरं ही निघाले घरट्याच्या ओढीने 

दिनकरा तूही कुठे राहतोस हल्ली...

मावळतोस पुन्हा उगवतोस नित्यनेमाने .... 

अशा सांजवेळी ...मनी उठे काहूर तुझ्या स्मृतीने.. 

संदेश माझा तिजला पोहचवाल का रे पाखरानो ...

घालमेल या जीवाची तुम्हिच समजू शकता ना रे ...

वाट मी पहातो मी तुझी ,निरोप एवढा तिला म्हणावं... 

अशा सांजवेळी ...साद माझ्या मनाची ऐक तू नव्याने ..

आठवत का ग तुला तो समुद्र किनारा 

तो खट्याळ वारा , मिलन घडवणारा..

हाती हात - तुझा ते भारावलेले क्षण सारे 

अशा सांजवेळी ...मन वेडेपिसे तुझ्या आठवणीने. ..  

का कुणास ठाऊक असे वाटते नेहमी 

पोहचले असतील पक्षी त्यांच्या इच्छित स्थळी ते 

कि हरवलेही असतील दिशा ते तुझ्याप्रमाणे ...

अशा सांजवेळी ... तुझी सोबत असायला हवी होती . .. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance