आपण सर्व भारतीय
आपण सर्व भारतीय
जातीयतेची जंग नको
शांततेचा भंग नको
नाहक वातावरण तंग नको
अपेक्षाभंग तर नकोच नको
भारत आपला देश ...आपण सर्व भारतीय
श्रेष्ठ - कनिष्ठाची लढाई नको
भ्रमिष्ट भाविक भक्त नको
कोणतीही आगळीक नको
पुढाऱ्यांची गुलामी तर नकोच नको
भारत आपला देश ...आपण सर्व भारतीय
वंश वाद नको - धर्मसत्ता नको
प्रांतवाद नको ,नाहक वादविवाद नको
धर्माच्या नावावर मांडणारा उच्छाद नको
आतंकवाद तर नकोच नको ...
भारत आपला देश ...आपण सर्व भारतीय
कुणी वंदनीय नको
कुणी निंदनीय नको
कुणी बंधनिय नको
अविश्वसनीय तर नकोच नको
भारत आपला देश ...आपण सर्व भारतीय
राग नको , लोभ नको
द्वेष नको , भेदाभेद नको
मत्सर नको , मोहमाया नको
असूया तर नकोच नको
भारत आपला देश ...आपण सर्व भारतीय