Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

नासा येवतीकर

Others

3  

नासा येवतीकर

Others

आपली माणसं

आपली माणसं

1 min
183


देवाची पूजा करणारे हात

माणसांची सेवा करत नाहीत

जेवढा वेळ देवपूजेला देतात

तेवढा वेळ घरात देत नाहीत


पहिल्यांदा घरातल्या सर्वांना

सुखी आनंदी ठेवायला शिकावं

वेळ भेटलाच कदाचित तर

देवाच्या भक्तीमार्गाकडे वळावं


संसार करण्याचा सार कळेना

पण पोथी पुराणात वेळ घालती

देवापुढे वाती लावण्यात व्यस्त

घरात माणसं आजारी पाडती


साधू संत महात्मे महापुरुष

सारे एकच सांगत असतात

मानवाच्या सेवेत देव आहे

देव भेटत नाही कुठे मंदिरात


देवाला गरमागरम नेवैद्य

घरातल्याला शिळे तुकडे

देव खात पण नाही कधी 

पण लक्ष सारे त्या देवाकडे


सारे देव पाण्यात ठेवून 

देत नाही प्यायला पाणी

काही अर्थ उरतो का गाऊन

देवाची आरती भक्तीची गाणी


आपल्याची काळजी घेताना

देव सदैव सोबतच असतो

दुःखाच्या प्रसंगात नक्की 

आपल्या पाठीमागेच असतो


अजून ही सांगणे एकच आहे

नको वेळ वाया घालू पुजापाठात

वयोवृद्ध आई वडिलांची सेवा हीच

पंढरपूर काशी आहे तुझ्या घरात


आई बाबाची मनोभावे सेवा 

हाच आपला खरा धर्म आहे

निःस्वार्थ भावनेने केलेले काम

हेच आपले खरेखुरे कर्म आहे


तुझ्या भटक्या मनाला आवर

मानवाच्या सेवेत तुझे मन गुंतव

आपली माणसं जपून ठेवली की

यातच खरे पुण्याचे सुख मिळव



Rate this content
Log in