पाऊस
पाऊस
1 min
6.9K
पाऊस आला सरसर
वसुंधरा नटली सुंदर
अनाहूत वारा वाहे सगळीकडे
हिरवळ दाटे चोहिकडे //१//
संथ वाहतात नद्यानाले
राधेच्या डोईवरी घट भरलेले
फुलांच्या बागेत गुलाब फुले
फुलपाखरे फुलांवर झुले //२//
अनाहूत तो दिसला मोर
मनमोहक तो चित्तचोर
नृत्य करतोय डौलदार
डोईवर तुरा छानदार //३//