भूमिका
भूमिका
1 min
341
आयुष्य आहे एक नाटक
करावा लागतो अभिनय
मुखवटे नवे नवे चढवून
जीवनाच्या रंगभूमीवर
कठोर परीक्षा असते
अभिनयाची आपल्या
कोणते पात्र कधी करू ?
हातात नाही आपल्या
नाटकातले प्रवेश हे
झालेच पाहिजे पूर्ण
भूमिका करतांना या
जीवनाच्या रंगभूमीवर