गर्भामधलं बाळ
गर्भामधलं बाळ
सांगे तुम्हा करून विनवणी, गर्भामधलं बाळ
असो मुलगा किंवा मुलगी
करा हो सांभाळ, माझा करा हो सांभाळ || धृ.||
अधिकार आहे मलासुद्धा जगण्याचा
हक्क आहे माझाही, हे सुंदर जग बघण्याचा
घालू नका घाव हो मजवर, बनूनिया काळ ||1||
करुन सोनोग्राफी तुम्ही, लावता तपास
ठेवता मुलाला बाकी, मुलीला गळफास
सांगा काहो तोडली तुम्ही, माणुसकीशी नाळ ||2||