Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Others

4  

Pandit Warade

Others

हवेत आहे

हवेत आहे

1 min
14K


सत्ता बया जयांच्या आली कवेत आहे।

गाडी जरा तयांची आता हवेत आहे।।


रयतेस कोण पुसतो भोळी, मुकी, बिचारी।

त्यांच्या मुळेच मंत्री सारे मजेत आहे।।


ढोंगी बुवा नि बाबा खाती लुटून तरिही।

का आंधळे पणाने सर्वस्व देत आहे।।


निंदा स्तुती जनांची करतो उगी कशाला।

आपापले बघावे, कोण्या दशेत आहे?।।


जेव्हा खते, बियाणे अवघे महाग होती।

सारी स्थिती बळीला चिंतेत नेत आहे।।


येतो जरी म्हणाला वेळीच येत नाही।

पाऊसही जरासा फिरकीच घेत आहे।।


चोहीकडोन सारे छळतात का बळीला?

काढील माज सारा कोण्या नशेत आहे?।।


Rate this content
Log in