Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Amogsiddh Chendake

Classics

3.5  

Amogsiddh Chendake

Classics

पैगंबर पोवाडा - महात्मा फुले

पैगंबर पोवाडा - महात्मा फुले

2 mins
9.8K


महात्मा फुल्यांनी पैगंबरांवर लिहिलेला पोवाडा -

महंमद झाला जहामर्द खरा ॥ त्यागीले संसारा ॥ सत्यासाठीं ॥धृ.॥
खोटा धर्म सोडा, सांगे जगताला ॥ जन्म घालविला ॥ ईशापायीं ॥१॥
जगहितासाठी अवतरले कुराण ॥ हिमतीचा राणा ॥ जगीं वीर ॥२॥
जगाचा पालक निर्मीक अनादि ॥ सर्व काळ वंदी ॥ निकें सत्य ॥३॥
मन केलें धीट, धरीली उमेद ॥ नाहीं भेदाभेद ॥ ठावा ज्याला ॥४॥
जनहितासाठीं खोटा अभिमान ॥ दिला झुगारुन ॥ अग्नीमध्यें ॥५॥
मर्द महंमद ढोंग्यांत पांगळा ॥ शोभला पुतळा ॥ सज्जनांत ॥६॥
नव्हता कोणी त्या तेव्हां साह्यकरी ॥ एकटाच सारी ॥ सत्य पुढे ॥७॥
एक त्याला फक्त सत्याचा आधार ॥ हिय्या समशेर ॥ मनामध्ये ॥८॥
य येई अजा । निर्मीकाच्या ध्वजा ॥ उभारील्या ॥९॥
कोणी नाहीं श्रेष्ठ कोणी नाहीं दास ॥ जात-प्रमादास ॥ खोडी बुडी ॥१०॥
मोडीला अधर्म आणि मतभेद ॥ सर्वांत अभेद ॥ ठाम केला ॥११॥
केल्या कमाईचा न धरी अभिलाषा ॥ खैरात दिनास ॥ देई सर्व ॥१२॥
मानवी मनाचा घेई अंतीं ठाव ॥ कल्याणाची हाव ॥ पोटीं माया ॥१३॥
मूर्तीपूजकांच्या बंडासी मोडीलें ॥ ढोंगी वळविले ॥ ईशाकडे ॥१४॥
देव एक ऐसें ग्रंथांसी स्थापिलें ॥ जग-बन्धु केलें ॥ मनुजास ॥१५॥
तेणें धर्मगुरु तप्तची जहाले ॥ हट्टासी पेटले ॥ मूर्तीसाठीं ॥१६॥
ढोंगी धार्मीकांनीं पाठलाग केला ॥ विवरीं लपला ॥ डोंगराच्या ॥१७॥
ईश रक्षी त्याला लंड वधूं गेले ॥ शोधीत फिरले ॥ सर्व व्यर्थ ॥१८॥
मेल्यामार्गे बहु त्याचे शिष्य झाले ॥ बळीस्थानीं आले ॥ किती एक ॥१९॥
कळूं आलें त्यांना आर्याजी अभद्र ॥ मुक्ते केले शुद्र ॥ दास्यांतून ॥२०॥
इस्लामा प्रसारी, आर्या घशीं पाडी ॥ खीळी सत्य-बिडी ॥ त्यांचे पायीं ॥२१॥
आर्यं वस्यु इस्लामानें मुक्त केले ॥ ईशाकडे नेले ॥ सर्व काळ ॥२२॥
आर्यंधर्म-भंड इस्लामें फोडीलें ॥ ताटांत घेतले ॥ भेद नाहीं ॥२३॥
मांगासह आर्या नेलें मसीदींत ॥ गणी बांधवांत ॥ आप्त सखे ॥२४॥
क्षत्निया जिंकलें राज्य त्यांचे झालें ॥ मोंगलांनीं केले ॥ मुक्त कांही ॥२५॥
जातिभेदाभेदीं फायदा तो साचा ॥ मुसलमानांचर ॥ झाला मोठा ॥२६॥
अंत्यजास धरी पोटीं सावकाश ॥ लाजवी आर्यास ॥ सर्व काळ ॥२७॥
म्हणूनीयां आर्य बोंब मारीताती ॥ शिमगा खेळती ॥ ब्रह्मरुपी ॥२८॥
भेद सोडुनीयां एका ताटीं खाती ॥ एकच बनती ॥ म्हणोनीयां ॥२९॥
इस्लामासी मान शुद्र राजे देती ॥ कर्बलास नेती ॥ ताबूतास ॥३०॥
इस्लामी बांधव अचंबा करीती ॥ धूळ फेकीताती ॥ मनूवर ॥३१॥
मनुस्मृति आहे पाखांडाची मुळी ॥ गिर्वाणाचे तळीं ॥ विळपळे ॥३२॥
कणकणीच्या गाई ब्राह्मण भक्षीती ॥ कां रे चिडवीती ॥ मुसलमाना? ॥३३॥
आर्य गाई खाती, वरी शुद्ध होती ॥ शुद्रा लढवीती ॥ जोती दावी ॥३४॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics