Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

SANJAY SALVI

Romance

4.8  

SANJAY SALVI

Romance

तू राधा होशील का ?

तू राधा होशील का ?

1 min
1.9K


मी होऊन बघतो कृष्ण एकदा,

तू राधा होशील का ?

विणवित राहू तुला कितीदा,

तू माझी होशील का ?

प्राजक्ताचा सडा होऊन पडेन तुझ्या अंगणी,

त्या फुलांची साज मी सजविन तुझ्या साठी साजणी,

यमुनेकाठी खेळ खेळूया तन-मन-धन अर्पूनी,

गोपिका मग साथही देतील रास क्रीडा खेळुनी,

मथुरेच्या बाजारी ये तू दूघ लोणी घेऊनि,

मग कश्यास अडविन मी वाटेवर नटखट त्या गौळीणि,

मंजुळ पावा तुझ्याच साठी घुमविन रानी-वनी,

सांग राधिके येशील का तू सर्व संग सोडूनि,

मी न कुणाचा, कुणी न माझे हेच सत्य जीवनी,

मग् काय कश्याला रुसेल ती पतिव्रता रुक्मिणी,

मी होऊन बघतो कृष्ण एकदा,

तू राधा होशील का 

विणवित राहू तुला कितीदा,

तू माझी होशील का ?


Rate this content
Log in