मैफिलीत तुझ्या आलो
मैफिलीत तुझ्या आलो
दिवाना आहे मी तुझा
ओळख हीच घेऊन आलो
नजराणा प्रेमाचा घेऊनी
मैफिलीत तुझ्या आलो .
तू एकटीच अशी एक
माझ्या जवळची आहे
बाकी सारे परके इथले
माझ्या जगात तूच तू आहे
वसंत फुलला मनात सखे
गुच्छ फुलांचा घेउनी आलो
मनतले गुपित गोड सांगण्या
मैफिलीत तुझ्या आलो .
श्रीमंतीचा वारसा तुज लाभला
आरसा दारिद्र्याचा मज लाभला
अंतर दोन टोकाचे मिटावे
मैफिलीत तुझ्या आलो