Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vijay Sanap

Others

4  

Vijay Sanap

Others

मानसून

मानसून

1 min
20.5K



जाळाविणा जळु लागे

साऱ्या जगातलं रानं

कुठं बसला दडून

ढगा आड मानसून... ||१ ||

झालं गाव भयभीत

नको रुसू आम्हावरी

धरणी माता असूसली

तुझ्या झेलण्यास सरी---- || २ ||

तुहया अमृत थेंबानं

रान होई हिरवं गार

आम्हा दीन दुबळयांना

मग मिळते भाकरं---!!३!!

पाण्याविणा शेतकरी

गेला कसा बावरून

काळया भुईच्या कुशीत

. बसे बियानं पेरूनं-----!!४!!

येशीलच तू म्हणून

मनामध्ये आस आहे

नाही आला तर आता

गळयामध्ये फास आहे----!!५!!



Rate this content
Log in