Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

भांडण पंचतत्वाचे

भांडण पंचतत्वाचे

1 min
319


गुण विशेष प्रत्येक तत्वाचे

गुंफत जातात एकमेकात

पंचतत्व तयार होण्यास ह्या ब्रम्हांडात...


शब्द हा एक गुण

असतो आकाश तत्वात...


शब्द आणि स्पर्श हे दोन गुण

असतात वायु तत्वात...


शब्द, स्पर्श आणि रूप हे तीन गुण

असतात अग्नी तत्वात...


शब्द, स्पर्श, रूप आणि रस हे चार गुण

असतात जल तत्वात....


शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाच गुण

असतात पृथ्वी तत्वात...


विनाश काले विपरीत बुद्धी...

भांडण होते पंचतत्वांचे...

तु मोठा कि मी मोठा...


पृथ्वी गंधाला बाजुला करते

रूपांतर होते त्याचे जलात...


जल रसाला बाजुला करता

रूपांतर होते त्याचे अग्नीत...


अग्नी रूपाला बाजुला करता

रूपांतर होते त्याचे वायुत...


वायु स्पर्शाला बाजुला करता 

रूपांतर होते त्याचे आकाशात...


पालन करता भगवान प्रकट होतात व...


आकाशातुन शब्द बाजुला करता 

रूपांतर होते त्याचे खोट्या अहंकारात...


एका शब्दात असतात पंचतत्व

अहंकारी शब्दामुळे विनाश होतो ब्रम्हांडाचा...


Rate this content
Log in