मन फुललेले
मन फुललेले
1 min
1.4K
शीळ ओठी ती
मोठ्या उत्साहाची
मागे ना पाऊल आता
जे पुढे टाकलेले!
दिवस बहरलेले
मन बहकलेले
नजरेस पडते
जग खुललेले!
असती भोवताली
निराशेचे थांबे
इथे न थांबे
मन फुललेले!