माझ्या छंदाचे सुरेख अंगण..
माझ्या छंदाचे सुरेख अंगण..
1 min
358
दिवसभरच्या रहाटगाड्यात
दोन क्षण हवे उसंतीचे
विचार येतो मनी अन
वेड लागते छंदाचे....
वाटते आकाशी घ्यावी भरारी
पण पंखाचे बन्धन नसावे
लेखणीने जेव्हा गाठावे आकाश
तेव्हा कामाचे चिंतन नसावे..
हाती असावी फक्त लेखणी
मनी असावा एकच ध्यास..
जग घ्यावे कवेत एका शब्दामध्ये
नको यमकाचा उपहास..
कविता माझी दोन शब्दांची
पण आनंद मज अनंतचा
माझ्या छंदाचे हे सुरेख अंगण
येथे सहवास फक्त शब्दांचा......