बालकविता
बालकविता
स्वप्नात गेलो
भू - भू च्या दुनियेत
सुंदर पायऱ्या
ढगांच्या रांगेत.
दमलो पायऱ्या
चढून चहून
भू - भू ने पाठीवर
नेले बसवून
सर्व भू - भू रांगेत
पाहत मला होते
घाबरायचे नाही
सांगत होते.
आम्ही आहोत
प्रामाणिक फार
माणसे पाळतात
आहोत वफादार.
जागतो रात्रीचे
पोलीसांना मदत
भू - भू करता
संपले स्वप्नात