गाणे गातो सदा तुझे
गाणे गातो सदा तुझे
1 min
6.9K
नशीबवान झालो मी लाभता सहवास तुझा
गाणे गातो सदा तुझे, हा रसिक चाहता तुझा ।।
मनात असतेस तू ,विचारही असतो तुझा
नसतेस सोबत तू , असे समोर फोटो तुझा ||
सोबत असती पाखरे आठवणींची माझ्या
लाभावा अशावेळी लोभस सहवास तुझा ||
बंध रेशमांचे जडता नाते सुंदर उमलले
बघ हे जगही आता सुंदर दिसू लागले ||
प्रेरक आहेस तू माझी ,अन मी भक्त तुझा
गाणे गातो सदा तुझे, हा रसिक चाहता तुझा ।।