Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Abasaheb Mhaske

Others

2  

Abasaheb Mhaske

Others

देवाधी देवा ! इंद्रदेवा

देवाधी देवा ! इंद्रदेवा

1 min
7.2K


जातीपातीला उधाण आले

जो तो माझीच लाल म्हणाले

विकास कुठे भेटेल तेवढंच सांगा ?

भीक नको पण... आधी कुत्रा आवरा

देवाधी देवा ! इंद्रदेवा...अजब तुझे सरकार


गर्जेल तो पडेल काय ?...

अभ्यास तुझा संपेल काय ?

बनून नकोस एवढा भोळा सांब...

जनता दाखवून देतेच थोडं थांब

देवाधी देवा ! इंद्रदेवा...अजब तुझे सरकार .


वरवर वाटतेय कायद्याचे राज्य

माजला मात्र चोहीकडे हाहाकार

महत्वाचे प्रश्न दूर राहिलेत ...

नको त्या गोष्टीचाच बोभाटा होतोय ...

देवाधी देवा ! इंद्रदेवा...अजब तुझे सरकार


तुमच्या फसव्या आमिषांना

आम्ही भीक घालत नाही...

घसा फुटेस्तोवर ओरडा खुशाल ..

विकास कुठे दिसत नाही

देवाधी देवा ! इंद्रदेवा...अजब तुझे सरकार



Rate this content
Log in