Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vijay Sanap

Inspirational

4.8  

Vijay Sanap

Inspirational

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

1 min
262



संताची ही भूमी

वेरूळची लेणी

शाहीराची वाणी

महाराष्ट्र माझा ।।


वाघाचं काळीज

पोलादाची छाती

राजा    छत्रपती

महाराष्ट्र माझा ।।


रायगडावरी

राजाची समाधी

गर्जे    दर्यामधी

महाराष्ट्र  माझा ।।


गरीबाचा वाली

माझा भीमराव

असे ज्यात नाव

महाराष्ट्र माझा ।।


सोसे उन वारा

सीमेचा जवान

असे अभिमान

महाराष्ट्र माझा ।।


हिंदू नि मुस्लिम

सारे भाई भाई

आनंदात राही

महाराष्ट्र माझा ।।


नांदे गोदाकाठी

संत  एकनाथ

दिसे   पंढरीत

महाराष्ट्र माझा   ।।


Rate this content
Log in