स्वप्नांची अप्सरा
स्वप्नांची अप्सरा
तुझे रूप जणू स्वप्नांची अप्सरा
मी प्रेमदिवाणा खरा
मी भावनांचा बांध अन
तू प्रीतीचा झरा
केसात माळून मोहक गजरा
दिलखुलास नखरा
मादक अदा
खिळल्या तुजवरी नजरा
मधुर मोहक अल्लड हसु
मानेवर भुरभुरणारे केस
तोडून पाश सारे
ओलांडतात लज्जेची वेस
तुझे रूप जणू स्वप्नांची अप्सरा
मी प्रेमदिवणा खरा