Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Others

0.8  

Abasaheb Mhaske

Others

एवढं तेवढं चालायचंच...

एवढं तेवढं चालायचंच...

1 min
7.1K


थोडसे आसू, थोडेसे हसू

सात्विक सगळे पंक्तीत बसू

धोत-यांच्या फुलांना टाळुया

सुगंधी फुलांना माळुया.

एवढं तेवढं चालायचंच  बाकी सर्व ठीक आहे

चूक भूल माफ, हेवे दावे हवेत कशाला?

क्षणिक आयुष्याची मुसाफीरी गड्यांनो!

राग व्दे , आसुया देवू मुठमाती

प्रेमानं सांधुया जिवाभावाची नाती

एवढं तेवढं चालायचंच, बाकी सर्व ठीक आहे

ईश्वरानं दिलं भरभरून किती घेशिल दोन करानी?

स्वर्ग - नरक इथेच गड्यांनों! आपलं आपणंच ठरवावं

परस्परांच्या मनात प्रेमाचा झरा अखंड खळखळावा

आनंद जिवनाचा सुंगध परी दरवळावा.

एवढं तेवढं चालायचंच, बाकी सर्व ठीक आहे

मूठभर पेरावं, पसाभर घ्यावं दानत जशी मातीची

स्वार्थासाठी फारकत  न करावी कधी नात्यांची

असू दे दुःख भलेही डोंगरा एवढे सोबत असावी 

तुम्हासारख्यां जिव्हाळ्याच्या मित्र अनं मैत्रीनींची

 एवढं तेवढं चालायचंच, बाकी सर्व ठीक आहे

 

       

 

 


Rate this content
Log in