हरवली मधुराणी
हरवली मधुराणी
ओठांवर नाव तिचे
जपतो रात्रंदिनी
प्रेम विरहाची वेदना
सलते माझ्या मनी
बोलक्या माझ्या भावनांना
अर्थ राहिला ना जीवनी
निरव शांततेत तिच्या स्वरांचे
गुंज उमटतात कानी
स्वप्नांचा या लपंडावात
लपली माझी मधुराणी
स्पदनी हूरहूर वाढली
विरहनयना आले पाणी