Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Nagesh Dhadve

Others

1  

Nagesh Dhadve

Others

वाट पाहीतो त्या दिसांची

वाट पाहीतो त्या दिसांची

1 min
1.0K


शेतात दिनभर राबुनी,
कष्ट मनभर करुनी,
आकांक्षा या परीक्षेची,
वाट पाहतो त्या क्षणांची,
वाट पाहतो त्या दिसांची

राबतो दिसभर सारे,
रात्रीस दिसे चांदणे तारे,
चटणी भाकरी गोड लागुनी,
वाट पाहतो त्या पिकांची,
वाट पाहतो त्या दिसांची

दुष्काळी त्या नदी-तीराची,
उपासमारी या गरिबांची,
हाव त्यास सावकारांची,
वाट पाहतो त्या उपकारांची
वाट पाहतो त्या दिसांची

अंगावरी लुगडा फाटका,
विचारांशी मिळे चटका,
भिती वाटे दरिद्री काट्यांची,
वाट पाहतो सुखी दिशांची,
वाट पाहतो त्या दिसांची.

-नागेश(nd)


Rate this content
Log in