अनमोल
अनमोल
1 min
225
अनमोल चारित्र्याचे
लेवू सुंदर लेणे
लागतो देणे
समाजाचे-----
चारित्र्याच्या रंगात
व्यक्तिमत्त्व टाकू उजळूनी
जपू मिळूनी
बांधिलकी -------
असो सर्वधर्मसमभाव
नको कुठे विषमता
निश्चय करता
प्रामाणिकपणे --------
सुंदर जीवन
सदा सफल करूया
प्रेमाने बोलूया
एकमेकांशी -----
चारित्र्य, व्यक्तिमत्व
सांगड घालूया
सार्थक करू या
जीवनाचे ---------