आमचे देशप्रेम
आमचे देशप्रेम
घर दार संसार तुमचा मातृभूमी ...
बंधू भगिनींनो शतदा प्रणाम तुम्हाला
ऊन वारा पावसाची तमा न बाळगता
प्राणपणाने तुम्ही हो लढता ,
कसं फेडावं ऋण तुमच ?
आम्ही स्वार्थी , अप्पलपोटे गड्यानो ...
निस्वार्थ सेवाभाव , देशाभिमान तुमचा
शतदा नतमस्तक व्हावे असे कर्त्तृत्व तुमचे
अमर जवानांनो ! आमचे देशप्रेम
15 augast , 26 Janewari ,श्रदांजली वाहण्यापुरते ...