बाप न कळला
बाप न कळला
1 min
13.9K
झाल्या चुका अनेक
तुम्हि माफ केले
बाप झालो जेव्हा
कळले...तुमच मन
ती शोधक नजर
तो आतला ज्वर
ते थरथरते अधर
न कळले...तुमच मन
प्रतिसाद मिळतो
उगाच भास होतो
भयमय वावर तो
कळले...तुमच मन
ओझे उपकाराचे
छ्त्र मायेचे
भान जबाबदारीचे
कळले... पालकत्व
हासु उगाच खोटे
आसु नयनात असे
जगु कसा अपराधी
न कळले...पालकत्व
सुखे सारी दीधली
दुखे सारी पचवली
सुखदुखाचि आच
न कळली...अजुनहि
बाप न कळला
पिता सच्चा होउ कसा ?
आदर्शवान स्मरु तुम्हाला
तेव्हाच होईन...खरा पिता