Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sanjay Raghunath Sonawane

Others

2.5  

Sanjay Raghunath Sonawane

Others

कर्मवीर भाऊराव पाटील.

कर्मवीर भाऊराव पाटील.

1 min
30.7K


प्रणाम महाराष्ट्र सुपुत्राला।समाजसुधारकाला।शिक्षण महर्षीला।

कोल्हापूर जिल्ह्यात।कुंभोज गावात।पवित्र स्थानात।

जन्म झाला माय मातीत।जी जी जी

संघर्षवीर कार्याला।दीपमान झाला।समाज सेवेचे व्रत घेण्याला ।

शेतकरी कुटुंबाच्या संस्कारात।शिक्षण जिद्दीने कष्टात।

गरीबासाठी शिक्षण व्रत।सुरू केले महाराष्ट्रात।जी जी जी।

गरीबांचे हाल पाहून।ह्रदय गेले हेलावून।जीवाचे करुन रान।देह झिजला मातीवर।महाराष्ट्राचे शिक्षण शिल्पकार।

संघर्षवीर।शिक्षणाचा केला प्रसार।जी जी जी

रयतेसाठी महाराष्ट्रभर।भटकनती वाड्या वस्तीवर। गरीबासाठी झाले आधार।वस्तीगृहांची सोय करुन।

कमवा, शिका मंत्र महान।कष्ट आणि स्वावलंबन। जी जी जी

सहभाग स्वातंत्र्य संग्रामात।देशकार्यात।देशमुक्त करण्यात।सत्यशोधक समाजवीर।शिक्षण धुरंधर।

कार्य शिखरावर।वास्तवात आले खरोखर।जी जी जी

साक्षर केले खेड्यापाड्याला।अवघ्या महाराष्ट्राला।प्रत्येक मानवजातीला ।

रयत शिक्षण संस्थेचे रोपटे लावून।वट वृक्ष वाढवला कष्टान।पिढ्या, पिढ्यांचे केले कल्याण।कष्ट, जिद्द, चिकाटीपण।स्वभावाचे विशेष गुण।पद्मभूषण देवून सन्मान।देह झिजला चंदनासमान।जी जी जी

रयत शिक्षण संस्थेने।भाऊराव पाटील कर्मवीराने।क्रांतीकाराने,श्रमवीराने।कार्य केले मानवा अर्पण। जी जी जी


Rate this content
Log in