Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Manisha Potdar

Others

3  

Manisha Potdar

Others

चिंचा बोरं

चिंचा बोरं

1 min
333


होई उशिर मग सुसाट सुटायचो शाळेला

मग मिळायच्या छ्डया चणचण हाताला

कधी अंगठे धरा, कधी मारा फेऱ्या ग्राऊंडला


चिंचा,बोरं, आवळे, कैरी,पेरू चोरून घेई खायाला

चालत चालत टोळी मस्ती करत निघे शाळेला

लंगडी पळी, कबड्डी मज्जा येई खेळाच्या तासाला


सण साजरे होई,सुट्टी मिळत असे प्रत्येक सणाला

आम्हा भावडांना कपडे नेमकेच असत घालायला

खाऊ, फटाके, इतर वस्तु वाटा मिळत प्रत्येकाला


चटणी,भाकरी काही असो रोज जेवायला आंम्हाला

आनंद, समाधान,जानिव होती गरिबीत जगण्याला

टिप्पर,काच माती,खडे खडे असायचे खेळायला


आईला मदत करुन जायचो हुंदडायला, खेळायला

सुई दोरा, डबा ऐसपैस मज्जाच येत लपाछपीला

विट्टी दांडू, सुर पारंब्या भरपूर मिळे खेळायला


आम्हा भावडांना उधान येई दंगा मस्तीला

आई वडील रागवायचे,मारायचे आंम्हाला

शांत होऊन पुन्हा बसायचो अभ्यासाला



Rate this content
Log in