Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Others

2  

Abasaheb Mhaske

Others

कोण मेले कोणासाठी ?

कोण मेले कोणासाठी ?

1 min
7.0K


आयुष्याच्या या वळणावर शोधूनि उत्तर थकलो आता ...

कशासाठी जगतो मी अन कुणासाठी ?

आयुष्य आता भार झाले, जगणेही फार झाले...

दिशाही भटकंती सारी दुःख ही बेसुमार झाले


सूर गवसला कधी न कधी ताल गवसला तरीही...

जीवनगाणे गात राहिलो तर कधी दरवेशासारखं

रोजचाच नवा खेळ , नवा गाव , नवा रस्ता ...

नव्हते गाव कुठले माझे, न कसले ऋणानुबंध


चालत राहिलो गप्प गुमान इच्छा असो या नसो...

सोबत कुणाची असली - नसली कधीच चिंता न केली

न थकता चालत राहिलो , दोर तुलेल्या पतंगासारखं ...

गावानंतर गाव होते अन रस्त्याला रस्ते मिळत जाणारे ...


हे कसले प्रारब्ध म्हणावे ? अन असे हे जनावरागत जिणे ?

कोण कुणाचे ? कसली नाती ? कुठवर आता ही नाहक भ्रंमती...

संपवून टाकावा हा दिशाहीन प्रवास , फेकून द्यावीत ही देहाची लक्तरे

कशाला बसावं तंबू ठोकून ? कोण मेले कोणासाठी ? रक्त ओकून ?


Rate this content
Log in