अशी मी गायत्री
अशी मी गायत्री
माझे नाव गायत्री
नाही मुळी भित्री
काढते छान चित्रे
सगळ्यांशी मैत्री
जत्रेतून आणते मी
कात्री आणि छत्री
आवडीने खाते मी
मोसंबी आणि संत्री
पत्र येता मामाचे
मोठ्याने मी वाचते
सुट्ट्या आल्या की
कात्रजला जाते
योग्य सूत्र वापरून
गणित सोडवते
त्रिकोणाच्या बाजू
बरोबर मोजते
सुमित्राच्या लग्नात
वाजंत्री वाजली
गायत्री आमची
खुप खुप नाचली