प्रेम माझे, तुझे
प्रेम माझे, तुझे
प्रेम माझे, तुझे कळू दे गं
या जगाला सखे जळू दे गं
दूरता साहवे अता ना मज
पाय माझ्याकडे वळू दे गं
मोतिया रंग तोचि अश्रूंचा
तूज डोळ्यांतला गळू दे गं
जीव काबूत येत नाही ना
कैद का मन करू ? पळू दे गं
कैकदा मी झुरे तुझ्यासाठी
आज थोडं तुला छळू दे गं
थांब थोडं जरा अता राणी
वेळ घटिका अशुभ टळू दे गं
इश्क झाला मला दिवाणा मी
मदन आगीत विरघळू दे गं