Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Arun V Deshpande

Others

4  

Arun V Deshpande

Others

माणसाची

माणसाची

1 min
14.4K


माणसे भेटती रोजला  

नित्य नव्या रुपात इथे 

नाना कळा त्यांच्यात ,

आहेत तऱ्हा तितक्याच इथे ..।। १ ।।


कुणी भोळा-कुणी गाभोळा,

हर गोष्टीवरती डोळा 

ढेपी गुळाच्या पाहुनी ,

लगेच होती हे सारे गोळा ।। २ ।। 


सफाईदार बोलणे , 

रुबाबदार यांचे दिसणे 

क्षणात भुलती भोळे जन 

पाहुनी रूप देखणे  ।। ३ ।। 


साध्या मनाच्या माणसाची

इथे हो असते परीक्षा 

सराईत सही सलामत ,

साध्याच्या नशिबी शिक्षा ।।४ ।।


स्वार्थात गोडी असे मोठी 

माणसा आंधळा करते 

चांगले तर कधी घडत नाही ,

वाईट ते सारे घडते  ।। ५ ।।


Rate this content
Log in