शिल्पकार ( अभंग रचना )
शिल्पकार ( अभंग रचना )
दगडास देतो I अनोखे ते रुप ॥
देतसे स्वरूप I शिल्पकार ॥ १ ॥
मातीच्या गोळ्याला I आकार ती देती ॥
असे आईच ती | शिल्पकार ॥ २ ॥
अनुभव देती | धडा जीवनाचा ॥
आत्मविश्वासाचा | शिल्पकार ॥ ३॥
सोबती आपल्या I निसर्ग असतो ॥
तोच हो असतो | शिल्पकार ॥ ४ ॥
शब्द शब्द जोडा I रचना रचता ॥
खरा रचयिता | शिल्पकार ॥ ५ ॥