Shital Yadav

Romance


3  

Shital Yadav

Romance


प्रीतधागा

प्रीतधागा

1 min 14.2K 1 min 14.2K

श्वासा-श्वासागणिक आहेस तूच

पण तुला मात्र याची जाणीव नाही


अबोल प्रीतीची ही मूक-परिभाषा

न समजावी असा तू नेणीव नाही


वाट बघूनी अधीर झाले हे नयन

अर्पिले जीवन होई कासावीस मन


नात्यांची घट्ट करता करता वीण

कळलेच नाही कधी उसवली टिपण


मखमली नात्यांची ही लाघवी शिवण

रेशमी प्रीतधागा करी भरदार ठेवण


प्रीतधाग्याने जोडले मनाचे रेशीमबंध

आजन्म दरवळे नात्यांचे हे निशिगंध


अवघ्या भावनांची भरीव केली टीप

तरी प्रीतधाग्याविना अधूरे हे वसन

प्रीतधाग्याविना अधूरे हे वसन !!!!


Rate this content
Originality
Flow
Language
Cover Design