Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Latika Choudhary

Abstract Others

2  

Latika Choudhary

Abstract Others

$ ओंजळ $

$ ओंजळ $

1 min
1.2K


धरणी व्याकुळ,अव्यक्त

बंधनात 'ती' अगतिक

कशी जडावली भाराने

भुभार सारेच सोसत

केविलवाणी पाही नभी

घेण्या जवळी विसावण्या

अशी शिशिर पानगळ

घाव ते मनीचे सांगण्या

आतुर वसंत पाहण्या

ऋतू श्रावणी बहरण्या

धाडी मेघदूत संदेशा

गगन तिच्या भेटी येण्या

गगन भासे उंच उंच

लांबच लांब,विशाल

दिसे कधी निरभ्र,स्वच्छ

भासे कधी काळेशार

कळेना,गहीवरणं की

यात्रा नयनी मेघांची

सरसावल्या सरी क्षणी

भरण्या ओंजळ धरेची ..!


Rate this content
Log in