श्रमवीर
श्रमवीर
श्रम हीच पूजा त्यांची
परिश्रम कठोर करिती
हे ध्येय सदैव त्यांचे
श्रमवीर म्हणावे यांना
स्वप्न उत्तुंग असती
दृष्टी भविष्य वेधी
दिवास्वप्न न पाहती
असती खरे मेहनती
आळशीपणास थारा
यांच्यापाशी नसतो
सदैव सज्जन माणूस हा
श्रमवीर म्हणवला जातो
परिश्रमास पर्याय नाही
फळ यशदायी मिळते
श्रम करिती मनापासून
त्यास महत्व कळते