Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

kishor zote

Others

3  

kishor zote

Others

दान धर्म

दान धर्म

1 min
651


राजा बिंबीसार I पहा वेळू वन ॥

केले त्याने दान | तथागता ॥ १ ॥


अनाथपिंडीक | बांधी जेतवन ॥

सूवर्ण देवून | मोहरा त्या ॥ २ ॥


विहार शोभते I भूमंडळी खास ॥

केले ते बुध्दांस I दान त्याने ॥ ३ ॥


दान पारमिता I सर्वश्रेष्ठ असे ॥

होती कष्ट कसे ? I अंगिकार ॥ ४ ॥


पहा इतिहास I असे तोच खास ॥

महत्व दानास I जानावे जी ॥ ५ ॥


राग विरहीत I मनुष्यास दान ॥

तेंव्हाच होईन | फलदायी ॥ ६ ॥


करा नेत्रदान | करा रक्तदान ॥

करा देहदान I आज घडी ॥ ७ ॥


अपेक्षा कशाला ? | परतफेडीची ॥

किंवा त्या स्वार्थाची l दान देता ॥ ८ ॥


गरजू गरिब I दुःख त्या लोकांचे ॥

दूर करण्याचे | दान हवे ॥ ९ ॥


सदा तुम्ही जाणा | त्याग असे देणे ॥

दान तेच देणे | सत्य हेच ॥ १० ॥


काही मिळण्याची I अपेक्षा नसावी ॥

ओढ ती असावी I देण्याचीच ॥ ११ ॥


मनाचे ते ओझे I हलके होईल ॥

सर्वांस देईल I सुख सदा ॥ १२ ॥


आपले आपले | कितीदा करावे ? ॥

मुक्तहस्त व्हावे | दान कर्म ॥ १३ ॥


ते दान देण्यास I बंधनच नसे ॥

मुखावर दिसे I समाधान ॥ १४ ॥


दान हाच धर्म | धम्म तो बुद्धांचा ॥

अनुसरायचा I मुक्तीपथे ॥ १५ ॥



Rate this content
Log in