तुझेच गीत गाता
तुझेच गीत गाता
श्वासात राजसा,संपावे कशास आता
प्रेमात या जगावे,तुझेच गीत गाता
ऊनाड वादळाचे का श्वास कोंडलेले
हा वात पैंजणी लाभे पंढरीस जाता
अंधार का असा रे नांदे सदाच दारी
सूर्यास छेडण्यास हातात बाण भाता
भेगाळली भुई भारावेल काय आता
लाभेल दान हिर्वाई यौवना भूमाता
मारून सात फेऱ्या लाभेल सात जन्मा
सौभाग्य दिधले ,वा हे शाप का विधाता?