रक्त शाहिराचे-स्फुर्तिगीत
रक्त शाहिराचे-स्फुर्तिगीत
रक्तातील खऱ्या शाहिरा
भीती तुला कुणाची?
कलाकाराची श्रीमंती
तुला थाप नको फुकाची
स्वाभिमानी आणि इमानी
जगणे तुझे कष्टाचे
प्रबोधन करतो जगासाठी
तू शब्द हृदयाचे .
स्वाभिमानी बाणेदार
वागणे तुझे कणखर
प्रबोधन करतो जगासाठी
तू तळपती तलवार
स्वानंदी तू, मुक्तछंदी
नसे तुला हाव
तुझेच शब्द तुझी श्रीमंती
जगण्याचा ठाव .
दुःख, संकटातून घडलास तू
खरा क्रांती शाहिर
तुझ्या जगण्यातून शब्द आले
महान झुंझार
शब्द पेरले तुझे जगात
केला भारत जागृत
न्याय, अन्यायाची भिती
तुला नाही जगात .
जगासाठी तुझी शाहिरी
असे सदैव तत्पर
न्यायासाठी वेचले आयुष्य
सदैव आयुष्यभर
जीवंत राहवे तुझे विचार
पुढील पिढ्यातून
गोरगरीबांसाठी न्याय मिळाला
तुझ्या शब्दातून .
गोरगरीबांसाठी प्रबोधन
आमचा पुरस्कार
कोटी, कोटी जनतेसाठी
आमचे भाग्यथोर
केले परिवर्तन तुझ्या शाहिरीने
देश दुमदुमला
वाली आम्हांस तुमच्या रूपाने
नवा अर्थ जगण्याला .
संजय सोनवणे गातो महिमा शाहिराचा
वसा स्वतः घेऊन
माणूस म्हणून माणसाला
हक्क शिकण्यातून
थाप पडते तुझी डफावर
तुझ्या क्रांती विचारातून
स्फूर्ती तुझी रहावी
युगा, युगातून .