Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

कू.शुभम संतोष केसरकर

Tragedy Others

3.9  

कू.शुभम संतोष केसरकर

Tragedy Others

दाम करी काम !!

दाम करी काम !!

1 min
533


डोळे देखत पाहत रहावे

पैशाचा हा खेळ सारा

"दाम करी काम" म्हणत

श्रीमंतांची ही जीवनधारा !! धृ !!


पैशाची ही जादू न्यारी

लहान - मोठ्यांना हाव सारी

धावत - पळत ह्या पैसामागे

आयुष्य संपवत राही क्षणोक्षणी !! १ !!


किती वाकावे , किती लोळावे 

ह्या पैशावर आपले सर्वस्व विकावे

सट्टेबाजी खेळत रात्रभर ह्या गल्लीत

आयुष्य जगणं पूर्ण विसरावे !! २ !!


पैसा बोलतो , पैसा विकतो

कवडी दमडीपाई माणुसकीस मुकतो

जिकडे तिकडे होणाऱ्या दंगलीत 

माणूस माणसाचा जीव ही घेऊ शकतो !! ३ !!


प्रतिष्ठित मान्यवर सारे

चौकशीतून मात्र सुटले

भ्रष्टाचाराने बरबटलेले हात सारे

पैशांनी धुवून घेतले !! ४ !!


आता म्हणावे तर काहीच नाही 

अंत होत आहे माणुसकीचा

शब्द खरे व अर्थ सोपे

" दाम करी काम " ह्या अर्थपूर्ण वाक्याचा !! ५ !!

" दाम करी काम " ह्या अर्थपूर्ण वाक्याचा !! ५ !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy