Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vijay Sanap

Others

3  

Vijay Sanap

Others

महागाई

महागाई

1 min
7.3K


महागाईने आता

कंबरड मोडलं

काय खावं आता

धान्यही सरलं -----||१||

सण दिवाळीचा

लेकीला होतं घेणं

या महागाईच्या पायी

राहीलं सावकराच देणं ----||२||

तुच सांग देवा

ताईला काय सांगू

साडीसाठी पैसा

आता कुणाला रे मागू ----||३||

आईला नव्हतं लुगडं

बापाच फाटलं धोतर

या महागाईनं मह्मा

खिशाला लावली कातर ---||४||

काय करु आता

सावकार मह्या दारात

कपडयासाठी पोरं

रडत होती घरात ------||५||

खरं सांगतो मले

जहर घ्याची पाळी आली

दिवाळीसाठी घरी

आली मही साली ----||६||

अच्छे दिनाचे आता

स्वप्न दिसत नाही

नाही कुणाचा भरवसा

कसी देऊ मी ग्वाही ----||७||


Rate this content
Log in