होय ! मी असाच!!
होय ! मी असाच!!
जगाच्या पाठीवर
हे जग झेलू पाहणारा,
स्वतःच्या स्वार्थासाठी
उपवासाच्या नावाने
भिकेचे डोहाळे लागणारा मी,
स्वतःसाठी, का या जगासाठी?
अश्रूंची किंमत मोजताना
त्यात मिळालेल्या सुखाची
व दुःखाची पारख करणारा,
मिळालेल्या दुःखाना, सुखांना
समाधानेच्या आशेवर
बाळगत, जग जिंकू पाहतोय !
ते सुद्धा क्वचितच
माझ्यासाठी !
अपयशांच्या चटक्याला
पुन्हा त्याच भोवती सावरत
यशाचा फोड माझ्याअंगी
बाळगतोय,
अंधारातपण दिसणाऱ्या
प्रकाशाची ज्योत पेटवणारा
स्वार्थी मी
हे माझ्यासाठी नव्हेच
म्हणून.......
स्वप्नामध्ये जग, मनामध्ये सुख
आणि दुःखात धैर्य देणारा
मी,....
फक्त या जगाला अर्पण!
होय ! मी असाच!
-नागेश(ndd)