Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

प्राक्तन रेषा

प्राक्तन रेषा

1 min
172


पाचवीलाच पुजलेली सटवाई

नवजात बाळासाठी प्राक्तन रेषा ओढते त्याच्या कपाळी...


गावा गावात मंदिर तीच

शाळुकेला शेंदुराने फासलेलच दिसत...


लोक भावनांचा आदर करत

जोपासल्याय जाताय परंपरा ...


गरीब श्रीमंत भेदभाव नसतो तीथे

बाळांच्या स्वास्थासाठी झटतात सारे...


मंदिर जिर्णोध्दाराच्यावेळी ठरले

गाववर्गणीतुनच अष्टधातुची मुर्ती तयार करण्याचे...


कविमनाच्या मुर्तीकाराने

सटवाईची मुर्ती साकारली छान...


आईचे ते प्रसन्न भाव 

चेहर्यात उतरवले मन लावुन...


बाळाला मांडीवर खेळवत स्वहस्ते मोरपिसाने 

ओढतेय ती प्राक्तन रेषा बाळाच्या कपाळी खास...


अदृश्य शक्तीला दगडात पाहात होतो नेहमीच आंनद

मुर्ती रूपात पाहता मन स्वतःतच हरवले जात...


नविन मंदिरात जुन्या पारंपारिक शाळुका

अन् सटवाईची मुर्ती भुषणावह आहे गावाला


मंदिराचा मोठा हॉल वापरला जातोय

गाव प्रबोधन, सार्वजनिक कार्यक्रमाला


मंदिर, नुसतच मंदिर नाही

तर आहे गावाची नवयुगासाठीची भुषणावह प्राक्तन रेषा


Rate this content
Log in