जन्मोजन्मीची साथ
जन्मोजन्मीची साथ
1 min
463
तुझिया करात दिधला
नाजूक माझा हात
देशील ना प्रिया
जन्मोजन्मीची साथ
तुझ्या विश्वासावर आज मी
सप्तपदी चालले
तुझ्या नावाचे कुंकूम
भाळी आज लागले
हार मुंडावळ्या ल्याले
बांधून मनगटी कंकण
तोडले पाश मायेचे
सोडले माझे मी पण
माय पित्याची सोडूनी माया
तुझ्या समवेत निघाले राया
आई-बाबा पडते पाया
पुसा अश्रू ते आशीर्वाद द्याया