आला पावसाळा...!
आला पावसाळा...!
1 min
1.5K
ढग पांढरे पांढरे
झाले बघा काळे काळे
आता गेला हो उन्हाळा
आला पावसाळा कळे....!
काळजीने चेहेरा कसा
होता उतरुनी गेला
चाहूल लागता पावसाची
शेतकरी फुलुनी आला ...!
नद्या - विहिरी - नाले
पाण्याने भरुनी आले
पिण्यासाठी आता पाणी
आले हो तहानलेले ....!
आली पावसाच्या संगे
हिरवाई चोहीकडे
रुप सुंदर सृष्टीचे
दिसे आता चोहीकडे ...!