Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Abasaheb Mhaske

Romance

2  

Abasaheb Mhaske

Romance

तुझी आस असते ना ..

तुझी आस असते ना ..

1 min
1.5K


तुझी आस असते ना ...म्हणून 

आठवण तुझी पास असते 

तू नाहीस समीप तरी ...

स्वप्नात मात्र हमखास असते 


मी गातो आजही तुझेच गीत 

पूर्वी गायचे आपण प्रेमगाणे ...

आता फक्त विरह गीत...

अन स्वप्नात असतेस तूच तू ...


तू काहीही समज गडे !

तूच माझा घात केला ...

जाणतेपणाने आघात केला 

जन्मभराची जखम देऊन .... 


मी होतो तुझ्यासाठी तत्पर 

तू मात्र सोबत नाही केलीस ...

अर्ध्यावरती डाव मोडुनी ...

तू केंव्हाच त्याची झालीस ...


माहितेय मजला तू आहेस हट्टी 

माहीत होणार आता आपली गट्टी 

तुझे तुला लखलाभ सारे ...

माझे सुख- शांती माझे मला देऊन जा 


नाही तर नाही साथ तुझी ...

आठवणीही जीवघेण्या त्या 

आता तरी घेऊन जा ...

मागणे हे शेवटचे तरी देऊन जा ...


Rate this content
Log in